रुपाली पीटर चे पत्र पलटते, त्या मागे त्यानी तिच्या साठी गाणं लिहिलं होतं ...
'Look into my eyes...
you will see what you mean to me..
search your heart search your soul...
when you find me there you search no more...
don't tell me its not worth trying for...
don't tell me its not worth dying for..
Our love is true..
Everything I do ... I do it for you!! '
रुपाली डोळे बंद करते आणि काही क्षण स्तब्ध राहते. रुपाली ला असे शांत झालेलं बघून ओंकार ला काळजी वाटते. "काय झालं रुप्स?" ओंकार काळजीने विचारतो... ओंकार च्या तोंडून रुप्स ऐकूण रुपाली आयुष कडे बघते, रुपाली ला रुप्स म्हणून फक्त तिच्या जवळचेच हाक मारायचे. ओंकार च्या तोंडून ऐकूण तिला अस्वस्तता होते पण ती ते दाखवत नाही आणि काही नाही असे बोलते.
"ओंकार.. आम्ही उद्या साईट सिईंग ला जात आहोत, आलोच आहोत तर रुपाली ला इथले ऑक्सफर्ड वगैरे दाखवतो म्हणतो." आयुष ओंकार ला म्हणाला. ओंकार नुसताच त्याला बघून हसत होता.
त्याच्या कडून काही उत्तर येत नाही म्हणून आयुष पुढे म्हणतो,"तुझ्या अवॉर्ड सेरेमोनी साठी ऑल द बेस्ट, आम्ही बहुतेक तेव्हा इथे नसू."
"काय?? असं कसं? अरे आम्ही तुम्हाला बोलावून त्यासाठी घेतले इथे... पीटर हि असा न सांगता निघून गेला... माझं कोणी तरी हवं ना सोबत... "
"अरे हो.. पण "
"नाही नाही... मी ते काही ऐकून नाही घेणार... तुम्ही मला त्या दिवशी इथे पाहिजे म्हणजे पाहिजे... " ओंकार लहान मुलां प्रमाणे हट्ट करत होता.
"बरं ठीक आहे आम्ही त्या दिवशी येऊ परत पण अजून २ दिवस आहेत ना... आम्ही उद्या पर्वा फिरून येऊ... ते तर चालेल ना.. "
"म्हणजे रुप्स तू हि जाणार...??"
"अरे तिलाच तर दाखवायचं आहे..." आयुष हसत म्हणाला.
ओंकार शांत झाला.. तो काही विचार करत होता स्वतःशीच जरा नाराज वाटला ...
सर्व जण शांत बसले होते काही वेळाने ओंकार आपल्या फोन वर गाणी लावतो ...
CZYTASZ
ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?
Tajemnica / Thrillerप्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती हवी फ्रेंड्स जगावं त्या एका व्यक्ती साठी तिच्या आनंदासाठी, तिच्या असण्यासाठी तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असत वेगळं प्रत्येकासाठी... नवरा, कधी बायको कधी बाबा, कधी आई कधी ताई भावना मात्र एकच... कधी हसणार आहे...