TLJ ४| श्वास माझा होशील का? | 30

23 0 0
                                    


तिकडे आनंद च्या खोलीत.....

आरोही सर्व काम आवरून आली, आनंद स्वतःशीच हसत खिडकी शेजारी उभा होता, त्याला असे खूप दिवसांनी निवांत बघून आरोहीला खूप छान वाटले, ती त्याच्या जवळ जाऊन उभी राहते शांत, आनंद च्या लक्षात हि नाहीं येत ती बाजूला उभी आहे, काही वेळानी तो वळून झोपायला जाऊ लागतो तेव्हा बाजूला आरोही ला बघून दचकतो ... "ओह माय गॉड आरोही ...!!! तू घाबरवलंस मला... " तशी आरोही खळखळून हसते... तिला असे हसतांना बघून आनंद तिला ओढून आपल्या कडे खेचतो ... 'खूप हसायला येत आहे हा तुला... '

'आनंद... अहो... एक मिनिट... " आरोही स्वतःला त्याच्या मजबूत बाहुपाशातून सोडवण्याचा वायफळ प्रयत्न करत म्हणते "आनंद... सोडा न... तुम्ही स्वतःच घाबरला, मी तर तुम्हाला डिस्टर्ब नको म्हणून शांत थांबलेले न... "

"हो का... आणि काय बघत होतीस ... " आनंद तिचा हाथ सोडतो पण तिच्या कमरेभवती हाथ घालून तिला जवळ घेतो...

"बघत होते तुम्ही निवांत असे मनमोकळे हसतांना किती छान दिसता... किती दिवसांनी तुम्ही रिलॅक्स वाटलात"

"हम्म... " आनंद तिच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणतो...

"काय झालेलं? का हसत होतात मला हि कळू द्या... " आरोही त्याच्या गळ्यात भवती आपले हाथ घालत म्हणते.

"अगं काही नाहीं आयुष ची खेचायला खूप मज्जा येते... त्याला कितीदा समजावलं आहे... पण वेड्या सारखंच करतो... आता ते बनियान मध्ये त्याचा फोटो क्लिक झाला होता ... घरच्यांना फोटो दाखवायच्या आधी आपण सॉर्ट करून घ्यावं कोणते फोटो दाखवायचे कोणते नाहीं... पण हा आहे कि समजतच नाहीं... "

"काय नाहीं समजत ??" आरोही न समजून विचारते ...

"आता बघ... समज, आज जे झालं ते आपण आपले काही ट्रिप चे फोटो दाखवतांना झाले असते तर??"

"'म्हणजे? आपण असे कोणते वेगळे फोटो काढतो... "

"अच्छा.. मॅडम तुम्हाला डिटेल्स हवेत का... माझ्या कडून ऐकायच्या का... " आरोही आपले हसू गालात लपवत म्हणते... "नाहीं तसं, काही नाहीं तुम्हाला सांगायचे नसेल तर ठीक आहे... "

ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?Donde viven las historias. Descúbrelo ahora