संध्याकाळी बाकीची सर्व काम आवरून रुपाली रूम मध्ये येते तेव्हा परत तिची नजर त्या पुस्तकावर जाते, एक अनामिक ओढ तिला त्या पुस्तकाकडे खेचून नेते, ती पुस्तक हातात घेते आणि निवांत वेळ असल्यामुळे रेडिओ लावून वाचायला घेते...
'तेरा मुझसे है पहले का नाता कोई... यु हि नही दिल लुभाता कोई...
जाणे तू या जाणे ना... माने तू या माने ना... देखो अभि खोना नही... कभी जुदा होणा नही...
अबके यूही मिले रहेंगे दोनो... वादा रहा ये इस शाम का...!!'
गाणं गुणगुणत रुपाली पुस्तक उघडते...
'चला... एका वेगळ्या प्रवासावर... हि जर्नी आहे प्रेमाची... ह्या प्रवासात आपल्या सोबत आहेत अरुण आणि कावेरी. मला आशा आहे तुम्हाला हा प्रवास नक्की आवडेल.... मी कावेरी, हि आहे माझी कथा... '
रुपाली कथा वाचण्यात मग्न होते.... वेळ कसा सरकू लागतो तिला कळत नाही... ती कथा मध्ये रमून जाते. कावेरी आणि अरुण च प्रेम जणू ती अनुभवत होती, अरुण वर कावेरी चिडली कि रुपाली हि चिडायची आणि अरुण नि तिला हसवले कि तिला हि हसायला यायचे...
आयुष घरी येतो तेव्हा रुपाली ढसा ढसा रडत होती... तो घाबरून गेला... "रुप्स काय झालं तुला?" तो घाबरून विचारतो... रुपाली पदराने डोळे पुसत मोठा श्वास घेत म्हणते... "कावेरी आणि अरुण वेगळे होणार आहेत... "
ते ऐकून आयुष गंभीर होतो... "काय झालं? भांडलेत का ते?"
"नाही... त्यांचं शिक्षण झालं... आता पुढे शिकायला वेगळे वेगळे जावं लागेल... कावेरी ला इंजिनेर बनायचं आहे आणि अरुण ला डॉक्टर... " आयुष रुपाली कडे बघतो आणि तिला असे रडताना बघून म्हणतो...
"कोण आहेत हे कावेरी आणि अरुण? मी ओळखतो का?"
रुपाली मान हलवून नाही असे म्हणते... "मुंबईतलेच आहेत पण... "
आयुष ला काही आठवते आणि तो म्हणतो... "अगं त्यांना सांग पुण्याला जाऊन भरती विद्यापीठ मधून करा शिक्षण... दोघांना एकत्र शिकता येईल " असे बोलून आयुष फ्रेश व्हायला जातो... आणि रुपाली परत कथा वाचू लागते...
BẠN ĐANG ĐỌC
ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?
Bí ẩn / Giật gânप्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती हवी फ्रेंड्स जगावं त्या एका व्यक्ती साठी तिच्या आनंदासाठी, तिच्या असण्यासाठी तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असत वेगळं प्रत्येकासाठी... नवरा, कधी बायको कधी बाबा, कधी आई कधी ताई भावना मात्र एकच... कधी हसणार आहे...