आयुष नि ओंकार ला संध्याकाळी यायला तर सांगितले पण त्याच्या शी बोलून झाल्यावर त्याचे कोणत्या कामात मन लागत नव्हते... त्यामुळे तो दुपारीच आपली काम आटपून घरी जातो, त्याच्या मनात एक विचित्र अशांती पसरली होती, आज ओंकार चे बोलणे ऐकूण तो हि विचार करू लागला होता, त्याच्या मनात हा विचार का नाहीं आला? का त्याला नहीं सुचले बाबांना हि ह्या वयात कोणाची साथ हवी, त्यांना हि आधार हवा...
तो आपल्या विचारात होता, त्याला त्याच्या आयुष्यातले काव्या गेल्यानंतरची दिवस आठवले, काव्या गेली होती माहित होते पण प्रत्येक क्षणाला असे वाटायचे ती आता त्याला हाक मारेल, आता दार उघडले कि समोर ती हसत उभी असेल, तिचे ते सारखं त्याच्या अवती भवती वावरणं, त्याला तिची झालेली सवय, त्याच्या येण्याच्या वेळी तिचे दाराला लागलेले डोळे. जणू त्या क्षणासाठीच तो कामाला जायचा, ती हवीहवीशी वाटणारी, तिची त्याला शोधणारी नजर!! तिच्या जाण्याने खरंच काही बदलले होते का? कारण प्रत्येक क्षणात तर ती त्याला त्याच्या जवळच जाणवायची. आठवणी असतातच ना आपल्या सोबत, कोणी आपल्याला सोडून जातं तर काय त्यांचे प्रेम संपून जाते? कसं शक्य आहे ते, माझ्या मनात काव्या साठी जे प्रेम आहे ते तर नेहमी राहणारच ना... पण काय ते प्रेम पुरेसे आहे समोरचे आयुष्य सामोरे जाण्याला?
घरी गेल्यावर हि आयुष विचारातच होता. आज शांत होता तो, नेहमीचा आयुष नव्हता, रुपाली ला त्याच्या वागण्यातला फरक जाणवतो, हॉस्पिटल ला काही बिनसले असेल असा विचार करून ती त्याला थोडा वेळ एकटं सोडते. काही वेळानी घरची बाकी सर्व काम आवरून ती रूम मध्ये जाते, आयुष आपला खिडकी च्या शेजारी उभा असतो, बाहेर शून्यात बघत. रुपाली त्याला तसं रमलेला बघून, मागून जाऊन त्याला मिठी मारते, तिच्या अचानक असे त्याच्या जवळ येण्याने आयुष भानावर येतो, पण काही बोलत नहीं.
"आज लवकर कसा काय आलास?" रुपाली आपली मिठी आवळत त्याच्या पाठीवर डोकं ठेवत म्हणाली.
तरी आयुष काहीच नहीं बोलत, रुपाली म्हणून त्याचा चेहरा स्वतःकडे वळवते, आयुष ची उदास नजर बघून ती भुवया उंचावत त्याला म्हणते, "काय झालं माझ्या शोन्याला? आज मूड ठीक नहीं का?"
BINABASA MO ANG
ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?
Mystery / Thrillerप्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती हवी फ्रेंड्स जगावं त्या एका व्यक्ती साठी तिच्या आनंदासाठी, तिच्या असण्यासाठी तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असत वेगळं प्रत्येकासाठी... नवरा, कधी बायको कधी बाबा, कधी आई कधी ताई भावना मात्र एकच... कधी हसणार आहे...