"बघू ना... काय होतं उडी मारल्यावर... चल... तू आणि मी... एकत्र... जे व्हायचे ते एकत्र होईल..." असे म्हणत आयुष उडी मारायची तयारी करू लागला...
"थांब आयुष... एक मिनिट...तुला हेच हवं तर हेच .. पण जर हा क्षण माझा शेवटचा क्षण असेल ना तर मला तुला काही सांगायचे आहे... मी नाही हा परत येणार तुला भेटायला... त्यामुळे जे आहे ते आत्ताच बोलायचे आहे... मला नाही माहित ह्या नंतर आयुष्याचं काय होतं... बस... मला तुझ्या साठी जगायचं आणि तुझ्याच साठी मारायचं ... तुझी इच्छा आहे ना मी तुझ्या सोबत इथून उडी मारावी... चल तयार आहे मी... "
आयुष तिच्या जवळ जातो आणि तिला मिठी मारतो... "चल... "
असे म्हणत ते दोघे ब्रिज वरून उडी मारतात... "रुप्स... घट्ट पकड हा ... मला... खूप भीती वाटत आहे... "
"काय?? मला काही ऐकायला नाही येत आहे आयुष... " तीच बोलणं ऐकून आयुष स्वतःच तिच्या भवती मिठी आवळतो... "आता मला जाम मज्जा येत आहे... "
रुपाली आपले डोळे बंद करून असते... १६० फूट वरून ते खाली पडत होते... तो वाऱ्याचा तोंडावर पडणारा फोर्स वेगळ्याच दुनियेत नेत होता, एक वेगळाच अनुभव होता... भीतीत हि चांगले वाटत होते... त्या क्षणात राहण्याचा प्रयत्न करत होती रुपाली, पुढच्या कोणत्या हि क्षणी ते पाण्यात पडतील काही अंदाज नव्हता... आणि रुपाली ला पोहता येत नव्हते त्यामुळे घाबरलेली होती...
अचानक त्यांना एक झटका बसतो आणि ते दोघे पाण्यात पडणार तितक्यात वापस खेचले जाऊन हवेत उलटे लटकलेले होते... रुपाली बघते तर आयुष च्या कमरेला दोरी बांधलेली होती रुपाली अविश्वासाने आयुष ला बघत होती... "आयुष!! काय आहे हे??"
"ह्याला बंजी जम्पिंग म्हणतात... माय लव्ह!!" आयुष तिला आपल्या कडे खेचत म्हणाला... रुपाली ला आत्ता त्याला काय बोलावे कळेना.. तिचा इतका वेळ जीव घेतला म्हणून मारावे कि हा वन्स इन लाइफटाइम अनुभव करून दिल्या बद्दल त्याचे आभार मानावे...
"रुप्स... तूला कसं वाटू शकत ग कि मी तुला पाण्यात उडी मार म्हणेल?? मी तुला जीव द्यायला म्हणेल??"
ВЫ ЧИТАЕТЕ
ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?
Детектив / Триллерप्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती हवी फ्रेंड्स जगावं त्या एका व्यक्ती साठी तिच्या आनंदासाठी, तिच्या असण्यासाठी तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असत वेगळं प्रत्येकासाठी... नवरा, कधी बायको कधी बाबा, कधी आई कधी ताई भावना मात्र एकच... कधी हसणार आहे...