TLJ ४| श्वास माझा होशील का? | २३

23 0 0
                                    


.... आयुष तिच्या कडे बघताच उभा होता... "चल ना आता... इथेच साईट सिईंग करायची का?"
आयुष गालात हसत ड्राइवर सीट ला जाऊन बसतो... काही वेळ कोणीच काही बोलत नाही पण जसे ते लंडन सिटी सोडतात आयुष रुपाली कडे बघतो तीचा अजून हि मूड ऑफ होता,
"कम ऑन रुप्स अशी काय करतेस... मी तर दिलेली ना तुझ्या हातात चालवायला? आता अशी रुसून बसणार आहेस का पूर्ण रास्ता ?.. आणि नेमकं तू कोणावर रुसली आहेस? गाडीवर? स्वतःवर कि मी पोर्शे आणली म्हणून?"
रुपाली नाक मुरडत बाहेर बघते... आयुष स्वतःशीच हसत राहतो...
"राह में उन्स मुलकात हो गायी... जिसे डरते थे वही बात हो गयी... " आयुष बाजूनी जाणाऱ्या विदेशी मुलींना बघून गुणगुणू लागतो ...रुपाली त्याच्या कडे रागाने एक कटाक्ष टाकते तसा तो एक्दम चूप बसतो... बराच वेळ शांततेत गेल्यावर...

आयुष गाणी लावतो...

Still feels like our first night together..
Feels like the first kiss.. this getting better baby...
You are still the one..
the first time our eyes met the same feelings I get..
will love you longer.
you still turn the fire around in me..
if you are feeling lonely...
you are the only one I ever want...
make it good...
so if you love me... little more than I should...
Please forgive me... i don't know what i do..
Please forgive me i can't stop loving you.. I need you like I do... .
Please forgive me i can't stop loving you...
Still feels like our best times together..
Feels like the first touch... getting closer..
I remember the smell of your skin... I remember all your moves...
I remember you I remember everything

गाणं ऐकत ऐकत रुपाली एक क्षणाला आयुष कडे बघते, तो तिच्या कडेच बघत होता, नजरेने माफी मागत... त्याची ते ड्रॅमेबाजी बघून रुपाली ला हसू फुटते... ती त्याच्या हातावर मारते..."तू ना... आयुष आता सांगणार आहेस का कुठे चाललोय?"
"विंचिंग ला..." आयुष डोळे मोठे करून गोल फिरवत म्हणतो...
रुपाली गालात हसते. पूर्ण रास्ता दोन्ही बाजूनी हिरवीगार झाड होती.... निसर्गात हरवून गेले होते. त्यांना पोचायला दुपार होते. आयुष नि ऐरबनबी कडून छान घर बुक केलं होतं २ दिवसांसाठी...

रुपाली तिथलं निसर्ग सौंदर्य बघूनच खुश होती... अजून कुठेच जायचे नव्हते तिला... "कशी वाटली मग हि रोड ट्रिप? तुला ते बोरिंग मुसियम वगैरे काय दाखवत बसायचे म्हणून हे प्लॅन केले... "
रुपाली भुवया उंचावत त्याच्या कडे बघते आणि म्हणते.. "नॉट बॅड मिस्टर देसाई... आय एम इम्प्रेस्ड!!"
"आभारी आहे मॅडम आम्ही.... " आयुष बॅग आत घेत म्हणाला... "आता थोडा आराम करून घे मग संध्याकाळी तुझ्यासाठी सरप्राईज डिनर आहे... "
"ओह्ह्ह... तू बनवणार आहेस कि काय मग इथे जेवण माझ्यासाठी? म्हणजे लेट मी गेस... खिचडी तुझ्या हातची? हुह?" आयुष तिच्या कडे बघतो आणि म्हणतो... "नाही मॅडम... अजून तुम्ही आम्हाला तितके हि ओळखत नाही... सरप्राईज म्हणजे सरप्राईज!!"

ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?Nơi câu chuyện tồn tại. Hãy khám phá bây giờ