TLJ ४| श्वास माझा होशील का? | १७

21 0 0
                                    

आयुष रुपालीला कुशीत घेऊनच टॅक्सी करतो आणि हॉटेल वर घ्यायला सांगतो, रुपाली हळवी झालेली. आयुष तिचा हाथ आपल्या हातात घेऊन असतो काही बोलत नाही पण तिला शांत करायचा प्रयत्न करत असतो. थोड्याच वेळात ते हॉटेल वर पोचतात.

"रुप्स तू फ्रेश हो मी बघतो जेवायचं काय करायचं... " रुपाली मान हलवून रूम मध्ये जाते...

आयुष रिसेप्शन वर जाऊन काही चौकशी करतो, जेवायला खाली पण व्यवस्था होती ती सर्व बघून एक फेर फटका मारतो, आयुष त्यांच्या साठी जेवणाची ऑर्डर देतो, जेवण रूम वर पाठवायला सांगतो आणि मग रूम वर जातो.

रूम मध्ये...

रुपाली आपल्या आज च्या अनुभवात हरवली होती, विचारात मग्न, काय होतंय हे... तिला ते खाली पाडतांनाचे क्षण आठवत होते, तीच आयुष ला घट्ट बिलगन आणि आयुष च तिला घट्ट धरून ठेवणं... त्याच ते खोटं खोटंच मला सोडू नको म्हणणं... ती स्वतःशीच सर्व आठवून हसत होती. ती खरंच या दुनियेत नव्हती, असाच काहीसा अनुभव झाला होता आज. हातातलं घड्याळ काढून ती टेबलं वर ठेवते आणि गाणी लावते...

'जादू है.. तेरा हि जादू... जो मेरे दिल पे छाने लगा... दिवाने मेरे ये तो बता क्या किया तुने मिठा सा दर्द होणे लागा... मैं हू कहा में जणू ना.. '

गाणं गुणगुणत ती आपल्या केसांचा अंबाडा पाडते आणि फ्रेश व्हयला जाते. आरश्यात स्वतःला बघते, स्वतःचे डोळे बघून परत हसते.. सुजलेले ते, स्वतःला म्हणते... "कसली बावळट आहे ना मी... आयुष मला जीव द्यायला लावेल मी असा विचार पण कसा केला..." ती स्वतःच्याच प्रतिकृतीला बुद्धू असे म्हणते.. आणि कपाळावर हाथ मारून घेते... "माझा आयुष एक वेळ स्वतःचा जीव देईल पण मला असे काही म्हणणे... " ती दातात बोट घालून विचार करत असते, पण ते क्षण होतेच तसे.... कसला आहे ना आयुष मला कसलं घाबरवलं ह्यानी... मी काही करायला हवं.. स्वतःशी काही निश्चय करून ती थंड गार पाणी तोंडावर मारते... तिचा शरीराचा आणि मनाचा सर्व थकवा तसा पळून जातो....

ती बाहेर येते आणि आरशासमोर तयार व्हायला उभी असते... "रुप्स थिंक... काय करायचं?"

ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?Donde viven las historias. Descúbrelo ahora