TLJ ४| श्वास माझा होशील का? | ३६

18 0 0
                                    

आनंद आरोही च काही ऐकत नाही, "आरोही, मी खूप दिवसांपासून बोलायची वाट बघतोय, प्लिज ऐकून घे, आधी मला बोलू दे.."

आरोही नजरेनेच बोला असे बघते, "हे बघ आरोही मी खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे, आपण काही वर्ष लंडन ला जाणार आहोत.. "

"का?" आरोही ला हे अपेक्षित नव्हते, तिला ते ऐकून धक्का बसला...

"अगं आता मला कंपनी वाढवायची आहे, भारतात चांगला जम बसला आहे, मग लंडन ला एक ऑफिस नको का आपलं?"

"मला तुमच्या कडून हि अपेक्षा नव्हती आनंद... "

"म्हणजे? मी कंपनी नको वाढवायला?" आनंद चकित होऊन म्हणाला...

"तुम्ही कंपनी वाढवा आनंद, तुम्ही भरपूर मोठे व्हा, प्रगती करा, माझा त्याला काही आक्षेप नाही, पण कंपनी वाढवण्याच्या नवा खाली तुम्ही जे उद्भवलेल्या परिथितीला पाठ दाखवून पळ काढताय ते नाही आवडलं" आनंद आरोही च वाक्य ऐकून गंभीर झाला... आरोही पुढे त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली... "मी बोलले ना मला सर्व माहित आहे... मला माहित आहे तुम्ही हा निर्णय का घेतला, तुम्ही बाबांशी बोलत असतांना मी ऐकले होते सर्व...."

आनंद ला सर्व काही आता लक्षात आले... "आरोही, मला चुकीचं नको समजू, हे बघ मी पळ नाही काढत आहे मी समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहे, मी तुझ्यावर प्रेम नाही करत असं नाही ना... आणि नेहमी तूच आहेस, असणार माझ्या साठी... फक्त मला वेळ हवाय... "

"कशासाठी वेळ हवाय?"

"हे बघ आरोही, मला समजून तर घे, मी इथे राहिलो तर रोज शिवानी समोर दिसेल, माझ्या भावनांवर कसा आवर घालता येईल? इच्छा नसतांना हि मला तिच्या सोबत काम तर करावं लागेल ना..? म्हणून काही वर्ष लांब राहिलो ना कि सर्व आपोआप ठीक होईल... "

आरोही अजून हि त्याच्या डोळ्यात रोखून बघत होती, "सर्व ठीक होईल? काय तुम्ही आयुष्यभर असे जगू शकाल? रोज हि खंत नसणार का मनात भावना बोलून दाखवायला पाहिजे होत्या? काय हि घुसमट आयुष्यभर सहन करायची आहे? काय माझे आनंद मला पूर्ण पणे मिळतील? तुम्ही जगू शकाल असे पण मी नाही, माझा नवरा माझा नाही त्याला कोणी दुसरी स्त्री आवडते हि भावना माझ्या मनाला सतत त्रास देत राहील आणि मी त्यामुळे ह्या संसाराला कितपत समर्पण देऊ शकेल मला नाही माहित, असं अर्ध्या मनाने जगण्यात काय अर्थ आहे आनंद?" आनंद शांत राहून आरोही च बोलणं फक्त ऐकत होता, ती खरं तर त्याच्याच मनातल्या भावना बोलत होती ज्या बोलायला तो घाबरत होता. आरोही पुढे म्हणते, "अंजु बद्दल विचार करताय तुम्ही? मी समजावेनं तिला आणि ह्या जगातलं कितीहि मोठं वादळ का येईना हे सत्य तर नाही बदलणार ना कि तुम्ही तिचे बाबा आहात, तुमचा सदैव तिच्यावर हक्क राहील."

ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?Where stories live. Discover now