रुपाली आणि आयुष परत घरी जायला निघतात ...
रुपाली चा मूड ठीक करण्यासाठी आयुष गाणी लावतो... रेडिओ ऑन करतो...
'आते जाते जो मिळता हॆ तुमसा लागत है...
हम तो पागल हो जायेंगे ऐसा लागत हॆ...
ओ तेरे प्यार में... तेरे इंतेजार में... '
रुपाली गालातल्या गालात हसते आणि त्याच्या कडे बघते, तो तिच्याकडेच बघत होता... दोघांची नजर मिळते आणि दोघे खळखळून हसतात.. आयुष गाडी ची स्पीड वाढवतो...
घरी पोचल्यावर आयुष आनंद ला भेटायला जातो... रात्र बरीच झाली होती पण त्याच्या लक्षात येते कि आनंद तर शिवानी सोबत हैद्राबाद ला जाणार होता त्यांची डील साठी मीटिंग होती. ते आठवताच तो आपल्या खोलीत जातो. आयुष फ्रेश व्हायला जातो, रुपाली मुलांच्या खोलीत काय करत आहेत म्हणून बघायला जाते, सर्व छान झोपले असतात तिथे आरोही ला बघते, "वाहिनी त्रास नहीं ना दिला सगळ्यांनी खूप दंगा घातला असेल ना?..."
"नहीं ग... आणि सवय आहे मला सर्वांची" आरोही हसत म्हणाली..
दोघी काही वेळ गप्पा मारतात.. तितक्यात रुपाली च्या फोन वर मेसेज येतो...
'हे तुम्ही ठीक नाही केलं मॅडम... खूप महागात पडेल आता हे सर्व तुम्हाला....'
ते वाचून रुपाली जरा काळजीत पडते ती आरोही ला झोपायला जाते सांगून तिथून निघते... आपल्या रूम च्या टेरेस वर जाऊन ती तो मेसेज परत वाचते... तिच्या मनात जी भीती होती तेच झालं, तिच्यामुळे आयुष कोणत्या संकटात सापडतो आता असे झाले तिला. तितक्यात रूम मध्ये गाणं सुरु झालं...
'पल पल दिल के पास तुम रहती हो... जीवन मिठी प्यास ये केहती हो... '
तिचा आकाशी रंगाचा पदर वाऱ्यावर सळसळत होता. रुपाली रेलिंग ला धरून उभी होती शून्यात बघत विचारात मग्न... काय करू काय नहीं असा विचार करतच होती ती कि आयुष नि मागून येऊन धरले तिला...
"काय विचार करतेस?" आयुष तिच्या खांद्यावर हुंवटी टेकवत म्हणाला...
YOU ARE READING
ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?
Mystery / Thrillerप्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती हवी फ्रेंड्स जगावं त्या एका व्यक्ती साठी तिच्या आनंदासाठी, तिच्या असण्यासाठी तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असत वेगळं प्रत्येकासाठी... नवरा, कधी बायको कधी बाबा, कधी आई कधी ताई भावना मात्र एकच... कधी हसणार आहे...