अवॉर्ड चे कार्यक्रम संपते, किंजल च्या डोळ्यात आज वेगळीच चमक होती, किंजल रुपाली ला बिलगते आणि म्हणते, "ताई... थँक यु... आज तुझ्यामुळे खरं मला माझा ओंकार मिळाला... " रुपाली तिच्या डोळ्यात बघून फक्त हसते. ओंकार आयुष आणि रुपाली ला मिळालेले अवॉर्ड दाखवतो आणि म्हणतो... "तुमच्यासाठी... " आयुष त्याच्या कडे बघतो, "तुझ्या मेहनतीचे फळ आहे हे... "
ओंकार रुपाली कडे बघतो आणि म्हणतो... "हा अवॉर्ड माझ्या कडून तुमच्या दोघांसाठी... प्लिज स्वीकार करा... "
"नाही नाही ओंकार काही हि काय... हे तुझं आहे" रुपाली संकोच करत आपल्या हातातलं अवॉर्ड त्याला परत देत म्हणते... ते परत करत ओंकार तिच्या डोळ्यात बघत म्हणतो, "काव्या ची आठवण म्हणून ठेवा? तिची इच्छा म्हणून? आता हि नाही ठेवावे वाटत?" ओंकार भुवया उंचावत म्हणतो. काव्या चा विषय आल्यावर कोण आता त्याला नाही म्हणणार....
रुपाली आणि आयुष एकमेका कडे बघतात आणि मग गालात हसत त्या अवॉर्ड कडे बघत दोघे एकत्र म्हणतात, "थँक यु काव्या.. !!"
सर्व जेवण आटपतात आणि मग आयुष रुपाली त्या दोघांना निघतो असे म्हणतात, पहाटेचे त्यांचे परतीचे विमान होते.
"आम्हाला खूप छान वाटले तुम्हाला भेटून, मुंबई ला याल तेव्हा नक्की सांगा आपण भेटू"
ओंकार मान हलवत हो असे म्हणतो.
आयुष रुपाली आपल्या हॉटेल वर पोचतात, थकलेले होते दोघे दिवस भर ची एक्ससाईटमेन्ट झाली होती...
"आयुष सर्व आवरून बॅग पॅक करून ठेवाव्या लागतील, उद्या काही वेळ नाही मिळणार ना... " रुपाली बोलतच होती पण आयुष नि तो पर्यंत गाणे लावले होते आणि तिला आपल्या कडे वळवून तिचा हात धरून तिला गोल फिरवले...
छेड दु.. मैं कभी ऐसे तो दंग होती है...
खामखा चुम लू... तो भी तो जंग होती है...
हे!! उडी उडी उडी...ख्वाबो कि पुडी...
"आयुष... बॅग पॅक करायची आहे... " रुपाली डोळे मोठे करून हसत त्याला म्हणाली...
ESTÁS LEYENDO
ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?
Misterio / Suspensoप्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती हवी फ्रेंड्स जगावं त्या एका व्यक्ती साठी तिच्या आनंदासाठी, तिच्या असण्यासाठी तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असत वेगळं प्रत्येकासाठी... नवरा, कधी बायको कधी बाबा, कधी आई कधी ताई भावना मात्र एकच... कधी हसणार आहे...