TLJ ४| श्वास माझा होशील का? | १४

42 0 0
                                    


रुपाली सकाळी उठते आणि खिडकीचे परदे सरकावते, सकाळचं कवळ ऊन आत येते तसं आयुष तोंड फिरवून झोपतो... रुपाली त्याच्या जवळ जाते आणि त्याला उठायला सांगते पण आयुष काही उठेना... "आयुष मी अंघोळीला चालले... मी येई पर्यंत उठलेला पाहिजेस नाहीतर बघ हा... " रुपाली त्याला बजावत सांगते...

रुपाली ची अंघोळ हि होते तरी आयुष अजून गाढ झोपलेला... रुपाली त्याला झोपलेला बघून मान हलवत रेडिओ लावायला जाते...

'जगू कसा तुझ्या विना.. मी ग राणी... अश्विनी ये ना... '

ती गाण्याचा आवाज वाढवते कि त्रास होऊन आयुष उठेल...

ती आयुष ला उठवायला जाते... तसं आयुष उठून तिचा हात धरतो आणि तिला स्वतः कडे खेचून घेतो...

"ए.. तू जागा आहेस... उठ ना... " रुपाली बेड वर पडताच म्हणाली... आयुष तिच्या जवळ जात म्हणतो...

"हम्म... बघायचे होते.. काय होती ती धमकी... घे नाही उठलो मी तू परत येई पर्यंत... काय करणार आता??" आयुष तिच्या चेहऱ्यावर पडलेले ओले केस आणि विस्कटलेला टॉवेल बाजूला करत म्हणाला... रुपाली एकतर त्या धक्क्यातून बाहेर आली नव्हती कि तो जागा आहे... आणि पडल्यामुळे स्वतःला सावरायला हि वेळ मिळाला नव्हता त्यावर आयुष चे प्रश्न... ती काही विचार करायच्या अवस्थेत हि नव्हती...

'मी तर प्रेम दिवाणा नशीला ... जरा प्यार दे ' आयुष तिच्या डोळ्यातच बघत होता अजूनही आणि गण्याच्या बोल कडे तिचं लक्ष वेधून तो प्रश्न भरल्या डोळ्यांनी तिला सांगतो ...

'ये अशी मिठीत ये साजणी... पावसात प्रीतीच्या नाहुनी.... '

रुपाली त्याला हि नजरेने तिचे उत्तर त्या गाण्यातूनच देते... पुढच्या कडव्यातून ....

'स्वप्न आज जागले लोचनी... अंग अंग विहळले लाजुनी... तूच माझा राजा आणि मीच तुझी राणी... '

आयुष नजरेने खरं असे विचारतो... तशी रुपाली लाजून आपला चेहरा हाताने झाकून घेते... आयुष तिचा हाथ खाली करू बघतो तर ती मान हलवून नाही असे म्हणते... तर आयुष तिच्या हातांचेच चुंबन घेतो, रुपाली आश्चर्याने हात खाली करते तर लगेच आयुष चान्स मारून तिच्या ओठांचे चुंबन घेऊन तिला अजून मोठा धक्का देतो, "मला माहिती हा... मला हवं ते कसं मिळवायचं... " त्याची चालबाजी बघून रुपाली स्वतःशीच हसते आणि त्याला म्हणते... "मला हि माहित आहे हा... मला हवं ते कसं मिळवायचं... "

ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?Where stories live. Discover now