आज शिवानी खूप खुश होती... पण मनात एक शंका आली... आनंद नि तिला हे प्रोमोशन त्यांच्या वयक्तिक ओळखी मुळे तर नाही दिले? इतक्या लवकर इतके मोठे प्रोमोशन ती खरंच डीसर्व करते?
ती आनंद च्या केबिन मध्ये जाते... तिला बघून आनंद तिला आनंदाने हाथ समोर करत काँग्रट्स म्हणतो... पण शिवानी च्या चेहऱ्यावर त्याला अपेक्षित आनंद दिसत नाही...
"काय झालं शिवानी तुम्ही खुश नाही का तुमच्या प्रोमोशन नि?"
शिवानी शांत होती... "आनंद मला नाही वाटत मी इतकी मोठी जबाबदारी हॅन्डल करू शकेल..."
"का शिवानी... आत्ता हि सर्व तुम्हीच तर बघताय... हे फक्त कागदावर तुमची पोसिशन ची पुष्टी करत आहे... ह्या आधी तुम्ही तेच काम करत आहात... "
"आनंद मला... नाही वाटत मी करू शकेल..." शिवानी काळजी ने म्हणली.
"तुम्ही काळजी का करताय... मी आहे तुमच्या सोबत... मी काही तुम्हाला एकटं टाकून नाही जात आहे... " आनंद दिला धीर देतो.
"पण हा इतका म्हणत्वाचा प्रोजेक्ट आहे... आपल्या कंपनी साठी खूप म्हणत्वाचा आहे छोटीशी चूक पण खूप भुदंड देऊ शकते..."
"तुम्हाला काय वाटते मी माझ्या कंपनी चा इतका म्हणत्वाचा निर्णय असाच घेईल? मी खूप विचारपूर्वक तुम्हाला हि जबाबदारी देत आहे... "
"पण..."
"तुम्हाला नसेल पण मला आहे तुमच्या वर विश्वास... तुम्ही करू शकता... मी बघितली आहे तुम्ही घेतलेली मेहनत..." आनंद शिवानी ला धीर देत म्हणाला... "मी आज च्या आपल्या पार्टीत हे सर्वां समोर घोषित करणार आहे..."
"पार्टी?" शिवानी आश्चर्याने बघते...
"बघा तुम्ही इतके मग्न आहात कि तुम्हाला दादा च्या यशाची पार्टी हि लक्षात राहिली नाही... " शिवानी ला तो काय बोलतोय काही कळत नव्हते... तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघून आनंद पुढे म्हणतो...
"वाहिनी... आज आपल्या डायमंड च्या बिझनेस च्या २५ वर्षाच्या अनिव्हर्सरी निमित्य आपण नवीन स्टोर चे उदघाटन करत आहोत आणि हे स्टोर पूर्णपणे दादा च्या नेतृत्व खाली राहणार आहे... दादा चे हे किती मोठे यश आहे... आणि हे तुमचे... खरं म्हणजे आज ची पार्टी तुमच्या दोघांचे यश साजरे करायची पार्टी आहे... " शिवानी सर्व ऐकून शांत होती... तिला हे काही आठवतच नव्हते... ती स्वतःशीच विचारात होती... ती तिथून आपल्या डेस्क वर येते...
BẠN ĐANG ĐỌC
ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?
Bí ẩn / Giật gânप्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती हवी फ्रेंड्स जगावं त्या एका व्यक्ती साठी तिच्या आनंदासाठी, तिच्या असण्यासाठी तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असत वेगळं प्रत्येकासाठी... नवरा, कधी बायको कधी बाबा, कधी आई कधी ताई भावना मात्र एकच... कधी हसणार आहे...