TLJ ४| श्वास माझा होशील का? | 6

96 0 0
                                    


संद्याकाळी ....

आयुष आणि रुपाली पीटर ला भेटायला निघतात...

त्यांना आनंद भेटतो... "मी येऊ का सोबत?"

"नाही दादा.. मी करेल सर्व मॅनेज काळजी नको करुस... " आयुष त्याला आश्वासन देत म्हणाला.

आयुष गाडी काढतो, रुपाली त्याला नजरेनेच सर्व ठीक होईल असे बघते...

ते सांगितले त्या क्लब मध्ये पोचतात... रुपाली आयुष चा बाजू धरून त्याच्या सोबत आत जाते, सर्वत्र लाल पिवळ्या दिव्याच्या प्रकाशात मोठ्याने आत गाणे वाजत होते

'चढा जो मुझपे सुरूर है आ पस आ तू क्यू दूर है..

नशे में तेरे दिल चूर हॆ...

होश ना खबर है ये कैसा असर हॆ... तुमसे मिलने के बाद दिलबर...'

आयुष रुपाली ला घेऊन एका ठिकाणी थांबतो आणि पीटर ला शोधू लागतो...

"आयुष मला हि जागा ठीक नाही वाटत आहे... " रुपाली बाजूनी जाणाऱ्या टल्ली माणसांना बघून म्हणते...

तिथल्या वातावरणात मदिराचा मादक सुगंध हि पसरला होता त्यामुळे रुपाली ला असह्य होत होते..

"आयुष... मला माळमळतय ह्या वासाने... आपण त्याला दुसरी कडे बोलवायचे का... मी इथे अजून २ मिनिट हि नाही थांबू शकत रे... "

आयुष तिच्या कडे बघतो आणि हम्म म्हणतो... तो पीटर ला फोन करायला आपला फोन काढतो आणि फोन लावणार तितक्यात पीटर येतो... "या या आयुष्य साहेब... " त्याच्या बोलण्याने आयुष वर बघतो. त्याच पांढऱ्या कोट मध्ये होता तो... इतक्या अंधारात हि डोळ्यांवर गॉगल लावून. आयुष त्याला बघून एक मोठा श्वास घेतो आणि म्हणतो ... "आपण बाहेर मोकळ्या हवेत बसायचे का?"

"अरे असे काय म्हणताय तुम्ही... ह्या वातावरणात जी नशा आहे ती बाहेर कुठे??" पीटर आपल्या हातातला वाईन चा ग्लास दाखवत म्हणतो आणि रुपाली कडे बघतो...

"ओह मॅडम ला आवडत नाही का?? बॅड मॅनर्स..." असे म्हणत तो आपल्या हातातला ग्लास सोडतो आणि तो ग्लास जमिनीवर आपटून फुटतो.

ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?Where stories live. Discover now