'दुर्गा बने काली बने...आंधी है एक तुफान है,
ये शक्ती का वरदान है...
नारी से जो टक्रयेगा वो खाक में मिल जायेगा...
नारी बने चंडिका... '
रुपाली गाडी काढते... गूगल मॅप वर ऍड्रेस बघत ती त्या बंगल्यापाशी पोचते. संध्याकाळ झाली होती, त्यामुळे आजूबाजू चे दिवे लागले होते.
ती पोचते तशी बंगल्यात सेक्साफोन च्या धून मध्ये दिल क्या करे सुरु होते...
'जैसे पर्वत पे घटा रुखती है .. जैसे सागर से लेहेर उठती है, ऐसे किसी चेहरे पे निघा रुखती है... रोख नाहीं सक्ती दुनिया भर कि रस्मे... '
"मेरा बस चले तो दिल चीर के दिखा दु... " गाणे गुणगुणत पीटर तिच्या समोर आला... त्याला बघून रुपाली चे डोळे आग ओतू लागले... "ना कुछ तेरे बस में.. ना कुछ मेरे बस... में... "
रुपाली स्वतःशी हसली... कसला वेडा माणूस आहे ५ मिनिटात मारणार आहे आणि ह्याला काय सुचतंय बघा... रुपाली डायनिंग वरचा चाकू उचलते आणि सरळ त्याच्या गळ्यावर ठेवत म्हणते... "दाखव ना... घे हे चिरून दाखव... बघू काय आहे तुझ्या दिल मध्ये..." रुपाली चाकू त्याच्या गळ्यावर हलका दाबत म्हणाली.
रुपाली चे रूप बघून पीटर च त.. त.. म म होऊ लागले... "अरे... तुम्ही तर फार सिरीयस झालात मॅडम... " असं म्हणत तो चाकू आपल्या हातात घेतो आणि रुपाली च्या जवळ येऊ लागतो... रुपाली त्याच्या डोळ्यात बघते तिला काही कळत नाहीं काय होऊ लागले... त्याचे डोळे परत तिला कंट्रोल करू लागले होते... तो जसा समोर येऊ लागतो ती मागे जाऊ लागते... रुपाली ला काय झाले, अचानक फुलंदेवी ने साथ सोडून दिली, पीटर काही माघार घेत नव्हता. एक क्षण आला कि रुपाली मागे भिंतीला टेकली, तिला मागे सरकायला जागा उरली नाहीं आणि पीटर तर समोर येतच होता, कोणताच मागचा पुढचा विचार न करता रुपाली ने गन काढली आणि चालवली... पीटर च्या सरळ हृदयात लागते गोळी आणि तो तिथेच ठार झाला...
रुपाली मागच्या कार च्या हॉर्न आणि आपल्या विचारातल्या गोळीच्या आवाजाने वास्तवात आली... ती पूर्ण घाबरून गेली होती ... असं काही झालं माझ्या कडून तर? नाहीं नाहीं... मी असं काही नाहीं करू शकत... आयुष च काय माझ्या क्यू, आरुष अरुल चे काय? मी असा तडका फडकी निर्णय नाहीं घेऊ शकत... रुपाली गाडी ट्रॅफिक मधून बाजूला घेत स्वतःशी म्हणाली. ती स्वतःला शांत करते. स्वतःला समजावते, गन आहे ती फक्त स्वतःच्या बचाव साठी, मला पीटर ला मारायचे नाहीं... अजिबात नाहीं. तो कसा हि असला तरी मी त्याची शिक्षा माझ्या परिवाराला नाहीं देऊ शकत. रुपाली स्वतःला बजावते.
YOU ARE READING
ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?
Mystery / Thrillerप्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती हवी फ्रेंड्स जगावं त्या एका व्यक्ती साठी तिच्या आनंदासाठी, तिच्या असण्यासाठी तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असत वेगळं प्रत्येकासाठी... नवरा, कधी बायको कधी बाबा, कधी आई कधी ताई भावना मात्र एकच... कधी हसणार आहे...