TLJ ४| श्वास माझा होशील का? | ३2

18 0 0
                                    


आनंद, अनंत आणि अंकिता संध्याकाळी घरी निघतात, ललिता चे अंतक्रिया करून. तिघे हि शांत असतात, कोणी कोणाला काही बोलत नाही, प्रत्येकाच्या मनात आपलेच विचार सुरु होते. घरी आल्यावर आनंद ला आयुष भेटतो...

"दादा... अरे कुठे होतात तुम्ही? फोन उचलायची काही पद्धत असते कि नाही? आई बाबा तर फोन घेऊन गेले नव्हते पण तू? फोन का नव्हता उचलत... आम्ही किती काळजीत होतो सगळे. एक तर आरोही वहिनीला पण काही माहित नाही, त्यांना हि एवढेच माहिती कि तुम्ही तिघे रात्री हॉस्पिटल ला निघालात... "

आयुष ओरडत होता आनंद च्या बेजाबदारपणा साठी पण आनंद चे त्याच्या कडे लक्ष नव्हते. आयुष त्याला हलवून परत हातवारे करून विचारतो... "मी काय बोलतोय... कुठे होतात तुम्ही?"

आनंद भानावर येऊन म्हणतो... "आयुष अरे, बाबांची मैत्रीण ललिता... त्यांना हॉस्पिटल ला ऍडमिट केले होते त्यांना बघायला गेलो होतो"

"इतका वेळ?"

"आयुष त्यांनी आमच्या समोरच शेवटचा श्वास घेतला रे... "

आयुष ते ऐकूण स्तब्ध होतो, परिस्थितीचे गांभीर्य कळून तो नमतो, "दादा.. तू ठीक आहेस ना... "

आनंद मान हलवत नाही असे सांगतो.. "ते ... त्यांचे शेवटचे शब्द अजून हि कानात रेंगाळतायेत... किती प्रेम करायच्या त्या बाबांवर... कॉलेज पासून..."

"काय... ??? बाबांची कॉलेज ची गर्ल फ्रेंड?" आयुष ऐकून थक्क होत म्हणाला..

"आयुष!!" आनंद ओरडला त्याच्यावर, "काय बोलतोस काही अक्कल आहे का? तोंड सांभाळून बोल, एक तर त्या नाही आता ह्या जगात... "

"दादा अरे सॉरी मी तर तुला थोडं हसवण्यासाठी बोललो" आयुष थोडा निराश होत बोलला...

"सॉरी.. मी ओरडलो... पण प्लिज मला सध्या नाही बोलायचे कोणाशी, मला काही वेळ एकटं राहायचे आहे, मी येतो बोलायला तुझ्याशी प्लिज... " आनंद तेवढे बोलून आपल्या खोलीत निघून गेला.

आनंद च्या मनात वादळ उठलेले, तो कोणाशीच काही बोलत नव्हता, आरोही शी हि बोलला नाही, अंघोळ करून तो झोपी गेला, रात्री जेवला हि नाही. आरोही ला त्याला असे बघून त्याची काळजी वाटू लागली. आयुष त्याच्याशी बोलायला येतो रात्री, पण तो झोपला असतो...

ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?Donde viven las historias. Descúbrelo ahora