आरोही मुलांना खेळायला खाली गार्डन मध्ये घेऊन आली होती, ती तिथे एका बाकावर बसून होती, संध्याकाळची वेळ असल्याने काही लोक फेर फटका मारत होते, काही गप्पा गोष्टी करत होते तर मुलं आपली खेळण्यात व्यस्त होती. पक्षी आपल्या घरट्यात परतत होती, आरोही मात्र आपल्या मनात उठलेल्या वादळाला शांत करण्याचा प्रयत्न करत होती...
स्वतःच्या विचारात आरोही हरवलेली, माझे कुठे चुकले? असे का होतंय? मी आता काय करावे? आनंद ला असे घुसमटत नाही मी बघू शकत? देवा मी काय करावे? मला काही मार्ग सुचवा...
आरोही त्या क्षणात तिथे असून हि तिथे नव्हती, ती भानावर तिच्या नावाच्या हाकेवरून अली, "आरोही... " रणजित तिला आवाज देत होता. ती वळून बघते..
"अगं लक्ष कुठे आहे तुझं... मुलं भडतायेत ना... " रणजित ध्रुव ला अंजली पासून लांब करत म्हणाला...
आरोही भांबावून जाते.. "दादा... सॉरी... माझं लक्ष नव्हतं... "
"हो... मी हि तेच म्हणतोय... तू त्यांच्या सोबत त्यांना खेळवायला आलीस ना... त्यांच्यावर लक्ष नको का तुझे? पण मी बघतोय तुझं लक्ष दुसरीकडेच आहे..." रणजित ध्रुव कडे बघत त्याला म्हणतो... "ध्रुव, चल पळ आई बोलवत आहे तुला... " ध्रुव आढे वेढे घेऊ लागतो तर रणजित त्याला दटावून वर पाठवतो...
अंजली ला ध्रुव शी भांडताना बघून आरोही चे मन अजून विचलित होते ती तिला ओढून जवळ घेत तिच्या पाठीत दणका देत ओरडते, "अंजु.. का भांडतेस? दादा आहे ना... "
"भय्यूच मला चिडवत होता... " अंजली आपली बाजू मांडायचा प्रयत्न करत होती पण आरोही काही ऐकूण घ्यायला तयार नव्हती.
रणजित त्या दोघींच्या मध्ये पडतो... "अगं... एक मिनिट... काय तिला मारू नको ... "
एव्हाना अंजली नि भोकाड पसरले होते, रणजित तिला जवळ घेतो आणि समजावतो,"रडू नको बेटा, बघ मी भय्यू ला ओरडलो आहे ना... आता तो नाही तुला चिडवणार... जा खेळ..." तशी अंजली आपले डोळे पुसत परत बाकी मुलांसोबत खेळायला धावत जाते. रणजित तिला पाठमोरी जातांना बघत राहतो मग आरोही कडे वळतो... "काय चाललंय आरोही?"
ESTÁS LEYENDO
ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?
Misterio / Suspensoप्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती हवी फ्रेंड्स जगावं त्या एका व्यक्ती साठी तिच्या आनंदासाठी, तिच्या असण्यासाठी तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असत वेगळं प्रत्येकासाठी... नवरा, कधी बायको कधी बाबा, कधी आई कधी ताई भावना मात्र एकच... कधी हसणार आहे...