TLJ ४| श्वास माझा होशील का? | ३९

19 0 0
                                    

२-३ दिवस असेच विचार करण्यात निघून गेले, आयुष आणि रुपाली विचार करत होते पण काही सुचेना, असेच दोघे बसले होते एकदा...

"आयुष... एक सांग.." रुपाली ला काही सुचले जे तिला आयुष ला समजवायचे होते.

"काय??"

"तू दुसरे लग्न करायला स्वतः तयार झालास का?"

आयुष डोळे मोठे करून तिच्या कडे बघत होता, "रुप्स हा तुझा प्रश्न झाला? तुला माहित नाहीं का मी दुसरे लग्न करायला का तयार झालो? घरातले सर्व ऐकवायचे मला, क्यू ची काळजी घेण्यासाठी जरी घरी आज्जी, काकू, आत्या सर्व होते तरी आई ती आईच असते... असे म्हणून सर्वानी माझे म्हणणे फेटाळून लावले होते. शेवटी मी हि विचार करून तयार झालो मग लग्नाला."

"म्हणजे तू कंटाळून तयार झालास का लग्नाला?" रुपाली चा प्रश्न ऐकूण उत्तर काय द्यावे ते आयुष ला कळत नव्हते, तिनी उगाच अर्थाचा अनर्थ केला तर त्याचा सुरळीत चाललेला संसार बिघडायचा... "नाहीं तसं नाहीं ... कंटाळून नाहीं, तसं नाहीं..." रुपाली त्याला हाथ दाखवून थाबवते...

"ए.. वेड्या... तू मला स्पष्टीकरण नको देवूस ... मी इथे तुझी परीक्षा घ्यायला प्रश्न नाहीं विचारत आहे, घरच्यांना कसे तयार करायचे त्यासाठी विचारत आहे... म्हणजे मला काही वाईट नाहीं वाटणार तू म्हण्टलंस हो घरच्यांच्या मागे लागण्याला कंटाळून एकदाच हो म्हणालास लग्न करायला माझ्याशी तर... " रुपाली त्याच्या कडे खट्याळ नजरेने बघत म्हणाली... "हा पण आता माझा कंटाळा आला तुला तर नक्कीच चिडेल, रागवेल आणि मग मला नाहीं माहित मी काय करेल... "

"नाहीं ग राणी तसं नाहीं कधी होणार आता... " आयुष तिच्या जवळ जातो तसं रुपाली त्याला म्हणते... "मग आपण हि तेच करूयात ना... त्यांना रोज विचारू त्यांचे विचार बदलले का बघू, शेवटी एक दिवस कंटाळून हो म्हणतील ना ते सुद्धा? काय म्हणतोस?"

"रुप्स... ते मी नाहीं माझे बाबा आहेत, तुला बाबा माहित आहे ना एकदा त्यांनी निर्णय दिला कि दिला, आपल्याला दुसरा चान्स नाहीं, एकदा त्यांना समजवायचे आणि निर्णय आपल्या बाजूनी आला पाहिजे"

ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?Onde histórias criam vida. Descubra agora