TLJ ४| श्वास माझा होशील का? | २8

19 0 0
                                    


पुढची दोन दिवस आनंद घरी असतो, अंजली ला बरे नव्हते आणि त्याची हि तब्येत ठीक नव्हती, पण आनंद स्वस्त बसणार नव्हता त्याने फ्रेड विरुद्ध जे करण्याचा निश्चय केला होता तो ते करूनच राहणार होता. त्याचे घरी राहण्यामागचे खरे कारण हि हेच होते. जातीने लक्ष घालून तो ह्या कडे लक्ष देत होता कि फ्रेड च्या कंपनी ला भारतात परत कोणत्याच कंपनी सोबत बीझिनेस नाही करता येणार.

संध्याकाळी शिवानी घरी आली कि ती आणि आनंद खाली गार्डन मध्ये एक फेर फटका मारायला जायचे आणि तिथे मग शिवानी कंपनीत घडलेल्या घडा मोडी सांगायची.

आज हि ते खाली गार्डन मध्ये आले होते, तिथेच एका बाकावर बसतात,

"शिवानी, तुम्ही आहात म्हणून मला खरं कंपनी ची काहीच काळजी राहिली नाही. मला विश्वास आहे तुम्ही कंपनी साठी तेच निर्णय घ्याल जे मी घेईल... " शिवानी फक्त स्मित हसते त्याला बघत. शिवानी चे वाऱ्यावर उडणारे केस आणि तीच ते वारंवार त्या केसांना सावरून कानामागे करणे हे बघत बसने आनंद चा आवडता छंद झाला होता.

शिवानी आता आनंद ला जास्ती ओळखू लागली होती, आधी त्याच्याशी बोलतांना तिला वेगळीच औपचारिकता वाटायची ती आता गळून पडली होती. दोघे एकमेकांना चांगले समजू लागले होते आणि त्यांची मैत्री चांगली खुलू लागली होती.

"उद्या तुम्ही येणार ना ऑफिस ला? कि अजून सुट्टी हवी आहे?"

"हो... अर्थात येणार मी... तुम्ही काय समजलात मला बहाणा मिळाला का सुट्टीचा?" शिवानी त्याला मग काय असे बघते... "मी घरी राहून जे काम केले आहे ना उद्या कळेल तुम्हाला ऑफिस मध्ये."

दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये....

"सर.. तुम्हाला भेटायला कोणी ड्रेक आले आहेत, खूप महत्वाचे बोलायचे आहे म्हणतात.. " आनंद ला रेसेपशन वरून फोन येतो.

"ठीक आहे पाठवा त्यांना आत... " आनंद हातातल्या पेन चे झाकण लावत स्वतःशी हसतो, तो शिवानी ला आपल्या केबिन मध्ये बोलावून घेतो.

ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?Donde viven las historias. Descúbrelo ahora