TLJ ४| श्वास माझा होशील का? | १३

38 0 0
                                    


रात्री मधेच रुपाली ला जाग आली ती आयुष ला बघते तर तो टेरेस वर दिसतो... त्याला बघायला जाते ती,

आयुष ते पुस्तक उराशी घेऊनच झोपला होता... रुपाली पुस्तक घेते आणि त्याच्या मांडीवर बसते, त्याच्या गळ्याभवती हाथ टाकत ती त्याला बिलगून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपते... आयुष ला जाग येते तशी, तिला कुशीत भरून तो परत झोपायचं बघतो...

रुपाली बराच वेळ काही बोलत नाही... दोघे हि शांत होते... मग न राहून ती त्याला विचारते...

"आयु... "

"हम्म..."

"काव्या ला मिस करतोयस ना?"

आयुष काही नाही बोलत... पण त्याचा श्वास जड झालेला ज्याने रुपाली ला त्याच्या मनाची परिस्थिती समजते... ती त्याला घट्ट मिठी मारत म्हणते... "मला खूप आठवण येत आहे तिची... "

आयुष परत काही नाही बोलत... रुपाली ला त्याला बोलतं करायचं होतं म्हणून ती परत त्याला म्हणते... "काही बोल ना... असा काय तू? तुला काही नाही बोलायचं का माझ्याशी?"

"रुप्स सध्या मी नाही काही बोलायच्या मनस्थितीत... "

रुपाली उठून जाऊ लागते... आयुष तिचा हाथ धरून थांबवतो... "थांब ना माझ्यापाशी, नको जाऊस अशी... " तशी रुपाली थांबते... परत त्यांच्यात शांतताच बोलत होती. त्याच्या हृदयाची धडधड ऐकत रुपाली बसली होती... बराच वेळ निघून जातो... मग आयुष तिला म्हणतो...

"एक विचारू रुपाली... "

"हो... १ काय २ विचार... "

"तुला हे पुस्तक कुठून भेटलं?" तो प्रश्न ऐकूण रुपाली घाबरली... ती शांत होते... पीटर नि दिले असे सांगितले तर आयुष नक्कीच चिडणार... त्याला सर्व सांगावं लागेल... पीटर नि कधी दिलं.. ती त्याला का भेटायला गेली... सर्व... ती आपल्या विचारातच होती कि आता काय सांगायचं आयुष ला... तेव्हा आयुष म्हणतो...

"कधी भेटलं आणि हे तुला? काव्या नि कधी लिहलं असेल ग हे...?" आयुष तिच्या कडून उत्तराची अपेक्षा न ठेवत बस बोलत चालला होता... रुपाली परत शांत होऊन फक्त ऐकत बसली...

ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?Donde viven las historias. Descúbrelo ahora