TLJ ४| श्वास माझा होशील का? | २५

21 0 0
                                    


सकाळी सकाळी रुपाली ला जाग आली तर आयुष बाजूला नव्हता. फोन हातात घेऊन तिनी वेळ बघितला, ६ वाजले होते, आयुष इतक्या लवकर का उठला तिला प्रश्न पडला... आपल्या केसांचा अंबाडा पाडत, जांभळ्या देत त्याला ती बघू लागली. पण तिची नजर थांबली ते टेबल वर ठेवलेल्या एका पॅकेट वर, कुतूहल वाटून तीनि ते हातात घेतले आणि त्याच्या वरचे लेबल वाचू लागली... अक्षर तर आयुष चे दिसत होती..

'आज तुला ह्यात बघण्याची इच्छा आहे... बघ जमते का?'

तेवढे वाचून रुपाली च्या मनात गुदगुल्या होऊ लागल्या, तिला आयुष नि तिला दर्जेलिंग ला दिलेली पहिली भेटवस्तू आठवली... "आयुष ना... काही पण करत असतो.. आता काय आहे ह्यात?" ती स्वतःशीच लाजत विचार करत होती, न राहुन तिनी पॅकेट उघडले... समोर सोनेरी रंगाचा एम्ब्रॉयडरी केलेला एक सुंदर ड्रेस होता आणि एक सोनेरी क्लच होता, रुपाली ला सकाळी सकाळी आनंदाचा धक्का बसला होता त्या क्लच वर 'ओपन मी' अशी नोट होती म्हणून ती खोलून बघते तर त्या मध्ये ड्रेस ला सूट होतील असे कानातले आणि एक सुंदर नाजूक गळ्यातले होते आणि सोबत एक बॉक्स होता ज्यात नवीन फिशकट वाले घड्याळ होते...

रुपाली सर्व बघून थक्क होती, आयुष नि हे सर्व कधी केलं हा प्रश्न पडला होता तिला आणि ती... ? त्याच्या साठी एक स्वेटर घेऊन इतक्या हुशारख्या मारत होती, काही न सांगता, न बोलता काहीच न करता खूप काही केलं होत आज आयुष नि, त्यानी आज तिच्या पापण्या ओलावल्या होत्या. 'बावळट कुठला... कुठे जाऊन बसला आहे तर... '
असे म्हणत रुपाली पॅकेट वरची अर्धवट राहिलेली नोट वाचते .. .

'तयार झालीस ना कि खाली बॅनक्वेट हॉल मध्ये ये, मी तिथेच आहे तुझी वाट बघत... '
रुपाली ह्याच काय करू मी असं त्या चिठ्ठी कडे बघते... आज तर तिच्यावर भेटवस्तूंचा जणू वर्षावच झाला होता. रुपाली उठते आणि सवयी प्रमाणे गाणी लावते..

"बावरे प्रेम हे... बावरा जीव हा... सांग ना... सांग ना तू असा कसा...
श्वास गंधाळतो सोबती ने तुझ्या.. बोलके प्रेम हे बोलका श्वास हा... "

ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?Место, где живут истории. Откройте их для себя