#1

472 1 0
                                    


रात्र बरीच उलटून गेली होती ... शिवानी अजून हि आपल्या लॅपटॉप वर काम करत बसली होती. उद्या खूप महत्वाची मीटिंग होती आणि त्याच्याच तयारीत ती लागली होती. रणजित ने येऊन तिला कॉफी आणून दिली... तिला कॉफी देत म्हणाला, "आज खूप काम आहे का?"

"हम्म .." शिवानी त्याच्या कडे न बघता म्हणाली. त्याने परत कॉफी चा मग पुढे केला... "घेते ना... थांब ना आणि तू का जागा आहेस अजून? झोप ना..."

"हम्म... तू नाहीस ना बाजूला... मग झोपच येत नाही मला... " रणजित तिच्या डोळ्यात बघत म्हणाला...

शिवानी त्याच्या हातातून कॉफी घेत म्हणते ... "प्लिज... नको ना जागुस राज्या ... मला अजून बराच वेळ लागेल... झोप तू... येते मी..."

"इतकं काय काम आहे... मी काही मदत करू का... " रणजित तिच्या लॅपटॉप मध्ये लक्ष घालत म्हणाला...

"उद्या क्लायंट मीटिंग आहे त्या साठी काही रिपोर्ट तयार करायचे आहेत, नवीन जॉईन झालेल्या ट्रेनी नि काही चुका करून ठेवल्या आहेत त्याच सुधारत आहे... " शिवानी डोक्याला हाथ लावून बसलेली... रणजित तिचे डोके चेपून देतो...छान चोळून देतो... "उम्म्म रणजित मी झोपेल तू असं चोळत राहिलास अजून काही वेळ तर.... मी ठीक आहे... " शिवानी त्याचे हाथ धरून त्याला आपल्या समोर यायला लावत म्हणली...

"काय झालं? झोप नाही येत का..??"

रणजित मान हलवून हो म्हणतो... "मी काही मदत करू का सांग ना... " शिवानी मान हलवून नाही म्हणते आणि परत कामाला लागते... रणजित खाली वाकून तिच्या गालाचे चुंबन घेतो आणि मग आपल्या साठी खुर्ची घेऊन येतो आणि तिच्या बाजूला बसतो... त्याच्या जवळ थांबण्याने शिवानी ला छान वाटते, तीनि न मागता तो तिच्या साठी थांबून होता. बराच वेळ तो आपल्या मोबाईल मध्ये काही करत बसतो... मग गाणी लावून ऐकत बसतो, बराच वेळ आपले काम केल्यावर सर्व नीट झाले ह्याची शाहनिशा करून शेवटी आपला लॅपटॉप बंद करत शिवानी त्याला म्हणते "झाले... चल!!"

रणजित उठतो आणि मोबाइलला बंद करतो तितक्यात छान गाणे सुरु होते... रणजित तिला थांबवतो आणि म्हणतो... एक ना... आणि स्पीकर ऑन करतो...

ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?Tempat cerita menjadi hidup. Temukan sekarang