TLJ ४| श्वास माझा होशील का? | १०

51 0 0
                                    


शिवानी आणि आनंद परत हॉटेल ला जायला निघतात. फेड्रिक नि त्यांना २ दिवसांची मुदत दिली होती, ब्लुडायमंड रे हे त्यांचं मॉडेल आहे हे सिद्ध करायला आणि त्या सोबतच ती डील होल्ड वर गेली होती. माइंड्सपेक कंपनी ला पण बोलावून हे सांगण्यात आले. २ दिवसांनी दोन्ही कंपनीचे आमने सामने प्रेसेंटेशन होईल आणि मग फेड्रिक ठरवेल कोणाशी डील करायची.

गाडीत शिवानी चा उतरलेला चेहरा बघून आनंद तिला म्हणतो... "आता का उदास आहात तुम्ही शिवानी? मिळाला ना वेळ आपल्याला"

"आपली गोष्ट हि आपली आहे... हे सिद्ध करावं लागेल आता आनंद, मनाला खूप त्रास होतोय कुठं तरी राग येतोय स्वतःचाच" आनंद स्वतःशी हसतो...

"शिवानी... तुम्ही काही काळजी करू नका... जग असेच झाले आहे... चोराच्या उलट्या बोमबा ह्यालाच म्हणतात, पण तुम्ही काळजी नका करू सत्य नेहमी जिंकते... " शिवानी काही विचार करत ह्म्म्म असे म्हणते... मग आपला मूड ठीक करायला ती ड्रायव्हरला गाणी लावायला सांगते...

कोंबडी पळाली इथ भर उडाली फड फड फडाला लागली

कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली

शिवानी च्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल येते...

जसे हॉटेल येते ते आपापल्या रूम मध्ये निघून जातात... आनंद १ क्षण थांबतो आणि वळून शिवानी ला म्हणतो.. "शिवानी... तुम्ही आता आराम करा काही काळजी करू नका... रात्री डिनर ला भेटू खाली लाँज मध्ये, ओके... " शिवानी मान हलवून होकार देत आपल्या खोलीत जाते...

बरीच थकली असल्यामुळे शिवानी चा कधी डोळा लागतो तिला कळत नाही. संध्याकाळी जाग आल्यावर ती फ्रेश होते आणि कामाला लागते... आपल्या मॉडेल वर प्रेसेंटेशन बनवायला लागते. काही वेळाने आनंद तिला डिनर साठी बोलवायला येतो...

डिनर झाल्यावर शिवानी त्याला प्रेसेंटेशन दाखवायचे असे सांगते. दोघे बराच वेळ त्या प्रेसेंटेशन वर चर्चा करतात, आनंद त्यात काही बदल सांगतो, त्याच्या मतानुसार शिवानी काही बदल करते. ती त्याला उद्या पर्यंत सर्व नीट तयार ठेवेल असे सांगते. आनंद निघून जातो पण शिवानी काम करत राहते.

ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?Tahanan ng mga kuwento. Tumuklas ngayon