सकाळी अनंत पेपर वाचत असतात, आनंद जांभळ्या देत आला.... अनंत पेपर मधून डोकं वर काढत त्याला बघून म्हणले... "हि काय उठायची वेळ झाली? आज ऑफिस ला नाही का जायचं?"
आनंद डोळे चोळत त्यांच्या कडे बघतो... "बाबा, आज इच्छा नाही ऑफिस ला जायची... "
"अरे काल तर लंडन ला कंपनी सेटअप करायची म्हणत होतास आणि आता ऑफिस ला जायचं नाही... कसं चालणार आनंद... "
तिकडून गडबडीत शिवानी येतांना दिसली, अनंत तिला बोलावतात... "हे बघ बेटा ... हा ऑफिस ला जायचं नाही म्हणतोय... समजावं जरा त्याला..." शिवानी गालात हसते...
"बाबा.. " शिवानी अडखळत म्हणाली... "मी काय सांगू त्यांना बाबा... आज मी हि नाही जाणार आहे ऑफिस ला... "
अनंत हातातला पेपर घडी घालून खाली आपटतात अविश्वासाने आणि काय असे बघतात... शिवानी मान खाली घालून नजर चोरून आनंद कडे बघत असते, ती त्याला तुम्ही सांगितलं नाही का अजून असे बघते... आनंद सांगतो असे म्हणतो... तितक्यात आयुष हि येतो... त्याला त्या अवतारात बघून अनंत चा राग अजून चढला... "आयुष... अजून तयार नाहीस... ?? हॉस्पिटल ला नाही का जायचं?"
आयुष केसातून हाथ फिरवतो आणि आधीच शाळा सुरु असलेल्या आनंद आणि शिवानी च्या लाईन मध्ये उभा राहतो... "ते बाबा... काल रात्री... झोप झाली नाही...आज मला जावंसं वाटत नाही आहे ... मी सुट्टी घेऊ आज?"
अनंत उठून उभे झाले... "काय झाले आहे आज च्या पिढीला... आम्ही एक दिवस कमला सुट्टी नाही मारायचो... आणि तुम्ही आहेत झोप नाही झाली म्हणून सुट्टी मारायची... " अनंत मान हलवत फेऱ्या मारू लागतात... आयुष आनंद कडे तू का नाही सांगितलेस अजून बाबा ला असे बघतो... आनंद त्याला हि बोलतो
असे बघतोय... तितक्यात राहिलेले मेंबर हि सर्व हजेरी लावतात, अंकिता, आरोही, रुपाली आणि रणजित हि येतात...
"बाबा... " आनंद सर्वांना आलेले बघून अजून गोंधळ नको म्हणून आवाज देतो...
"काय बोलायचे साहेब आपल्याला आता... ??"
"ते बाबा... " आनंद थोडा अडखळू लागला... "मी आपला विचार बदलला आहे, मी इथेच कंपनी वाढवणार आहे, लंडन ला नाहीं जाणार..." आनंद चे बोलणे ऐकून अंकिता चा चेहरा आनंदला...
YOU ARE READING
ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?
Mystery / Thrillerप्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती हवी फ्रेंड्स जगावं त्या एका व्यक्ती साठी तिच्या आनंदासाठी, तिच्या असण्यासाठी तिच्या सोबतच्या नात्याचं नाव असत वेगळं प्रत्येकासाठी... नवरा, कधी बायको कधी बाबा, कधी आई कधी ताई भावना मात्र एकच... कधी हसणार आहे...