TLJ ४| श्वास माझा होशील का? | २९

23 0 0
                                    


आज सकाळ पासून मुलांची सारखी चुळबुळ सुरु होती... शाळेतून लवकर घरी यायचं आणि मग आपल्याला खूप सारे चॉकलेट्स मिळणार म्हणून सर्व आनंदात होते. सर्वांनी पटपट दूध पिले, तयार झाले आणि शाळेला जायला सज्ज... आरोही अंजली ला तयार करत असतांना अंजली तिला महणाली, "आई, काका, काकू कधी येणार आहेत?"

"अंजु तू शाळेतून आल्यावर ते आले असणार आहेत ओके? आता शाळेत मन लाव... नाही तर मग काका काकू आणलेले चॉकलेट्स देणार नाहीत हा ... "

"नाही नाही आई... मी छान अभ्यास करणार... " अंजली डोळे फिरवून म्हणते आणि पळत सुटते.

दुपारी...

सर्व मुलं शाळेतून आल्यावर सर्वत्र रुपाली आयुष ला शोधात होती, पण त्यांना कोणी दिसत नाही मग अर्चिता सगळ्यांना सांगते, "त्यांच्या विमानाला काही तांत्रिक अडचणींमुळे उशीर झाला आहे... अजून पोचले नाहीत भारतात, तुम्ही लोक पटपट अभ्यास आटपून घ्या मग तो पर्यंत येतीलच ते... " अर्चित सर्वांना बघून भुवया उंचावत काय असे म्हणते... सर्वांचे चेहरे पडलेले...

"अरे... मी बोलली आहे त्यांनी ना खूप सारे चॉकलेट्स आणलेत तुमच्या सर्वांसाठी... " तेवढे ऐकून परत सगळ्यांचे चेहरे फुलतात आणि सर्व जेवण उरकून आपल्या अभ्यासाला बसतात.

शेवटी ती वेळ येते जेव्हा सगळे त्यांच्या आगमनाची वाट पहात उघडत होते दारावरची बेल वाजते तशी क्यू धावत जाते दार उगड्याला... तसा ध्रुव हि पळतो... "माऊ आली... " तो टाळ्या वाजवत म्हणतो, क्यू त्याला मागे ढकलत म्हणते... "मी उघडणार... "

"नाही मी उघडणार... " दोघांचे भांडण सुरु होते ते बघून अंकिता दोघांना ओरडतात, "ते थकून आले आहेत दार उघडता का आता त्यांना आत तरी येऊ द्यात... "

ध्रुव डोळे मोठे करून म्हणतो, "आज्जी हीच नाही उघडत नक्की आहे बघ... " शेवटी दोघे एकत्र दार उघडतात समोर फक्त आनंद असतो चेहरा पाडून... "काका... आई बाबा कुठे आहेत?" क्यू काळजीने म्हणते...

आनंद काही बोलत नाही आणि घरात येतो... अंकिता आनंद कडे बघून म्हणतात, "काय रे?? तू एकटाच? आयुष रुपाली कुठे आहेत?" आनंद त्यांना इशारा करून थांब असे म्हणतो... क्यू आणि ध्रुव आनंद च्या मागे मागे प्रश्नांची लड फोडत फिरत होते, त्यांच्या न कळत रुपाली आणि आयुष मागून घरात येतात. मग आनंद त्यांना म्हणतो, "अरे मी कुठे त्यांना आणायला गेलो होतो? ते तर आधीच आलेत ना घरी... "

ती लाजते जेव्हा | पर्व ४ | श्वास माझा होशील का?Donde viven las historias. Descúbrelo ahora